sambhajiaarmar.org

संभाजी आरमार

संघटनेची सुरुवात.....

छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन १८ वर्षापूर्वी १४ मे २००८ रोजी संभाजी आरमारची मुहूर्तमेढ रोवली. आजही तो दिवस डोळ्यासमोर उभा आहे, जवळपास १०० माणसांच्या उपस्थितीत समाज कल्याण केंद्र येथे स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यापूर्वी साधारण २००० सालापासून संभाजी ब्रिगेडमध्ये शाखाप्रमुख म्हणून सक्रीय काम केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखावेगळ्या व्यक्तीमत्वाचं लहानपणापासूनच जबरदस्त आकर्षण होतं. त्याचवेळी मनावर शिवपुत्राच्या संघर्षमय जीवनाचा, त्यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या बलिदानाचा जबरदस्त परिणाम झाला तो कायमचाच. शिवराय तर अगदी बोलता येत असल्यापासुनच प्रत्येक मराठी मुलाच्या जयजयकारचे धनी आहेत. मराठी मातीत जन्माला आलेल्या माणसाला मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असेना शिवराय शिकवावे लागत नाहीत

संघटनेचे पदाधिकारी

छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर

तीन वर्षाची दमदार वाटचाल....

२१ ऑगस्ट २०२३ रोजी पवित्र श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर काही लाखात सुरु झालेली छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल दोनच वर्षात कोट्यवधींच्या उलाढालीवर येऊन पोचली आहे. त्याला पतसंस्थेने सुरुवातीपासून व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा परिणाम आहे. सोबतच दैनंदिन पिग्मी कलेक्शन देखील अत्याधुनिक मोबाइल प्रणालीद्वारे केले जाते. ग्राहकाला तत्पर सेवा देत असतानाच आपल्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेबाबतची माहिती तात्काळ मोबाईल मेसेजद्वारे दिली जाते. आज साधारण २५०० समाधानी ग्राहक ही आपल्या पतसंस्थेची मोठी उपलब्धी आहे.

संपर्क

Scroll to Top