sambhajiaarmar.org

Regd. No. SUR / NSR /RSR / (R) / 464 / 2000

३३० पूर्व मंगळवार पेठ, दक्षिणमुखी मारूती मंदिरासमोर, कुंभारी वेस, सोलापूर.

संपर्क : 9325371143 / 8329279227

तीन वर्षांची दमदार वाटचाल....

                          २१ ऑगस्ट २०२३ रोजी पवित्र श्रावण सोमवारच्या शुभ मुहूर्तावर काही लाखात सुरु झालेली छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल दोनच वर्षात कोट्यवधींच्या उलाढालीवर येऊन पोचली आहे. त्याला पतसंस्थेने सुरुवातीपासून व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा परिणाम आहे. सोबतच दैनंदिन पिग्मी कलेक्शन देखील अत्याधुनिक मोबाइल प्रणालीद्वारे केले जाते. ग्राहकाला तत्पर सेवा देत असतानाच आपल्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेबाबतची माहिती तात्काळ मोबाईल मेसेजद्वारे दिली जाते. आज साधारण २५०० समाधानी ग्राहक ही आपल्या पतसंस्थेची मोठी उपलब्धी आहे. स्थापनेदिवशीच मोठ्या प्रमाणात ठेवीदारांनी विश्वास ठेऊन पतसंस्थेमध्ये गुंतावणुकीस प्राधान्य दिले. संस्था स्थापन झाल्यापासून पहिले आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जेमतेम ६ महिन्यांचाच कालावधी प्रत्यक्ष व्यवहारासाठी मिळाला. स्थापनेचा कार्यालयीन खर्च, फर्निचर, नवीन साहित्य खरेदी असे मोठे खर्च असताना सुद्धा पहिल्याच वर्षी पतसंस्था नाममात्र का होईना नफ्यात राहिली ही अभिमानास्पद बाब आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे सन २०२५ -२०२६ या आर्थिक वर्षात मात्र संस्थेने दैदिप्यमान कामगिरी बजावत ठेवी, पिग्मी, मासिक आवर्तक ठेव, कर्ज वाटप आणि कर्ज वसुली अशा सर्वच बाबतीत काळजीपूर्वक वाटचाल केल्याचा परिणामस्वरूप संस्था उल्लेखनीय नफा प्राप्त करू शकली आहे. नवीन पतसंस्था असतानासुद्धा मागील आर्थिक वर्षात पतसंस्था तब्बल ७० कोटींचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरली आहे. सभासद ठेवीदारांचा विश्वास, योग्य आणि सुरक्षित कर्ज वाटप, खर्चात काटकसर या बाबीमुळे संस्थेला नवीन असूनसुद्धा चालू वर्षातच ५ लाखाहून जास्तीचा नफा मिळविता आला आहे. त्यामुळे सर्व आर्थिक निकषांची पूर्तता करत सभासदांना १०% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमुखाने घेतला आहे. तसेच एक लाखाच्या पुढील कर्जदारास अपघाती विमा संरक्षण दिले जाते. येणाऱ्या आर्थिक वर्षात ठेवींचे १० कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. पतसंस्थेचे सर्वच संचालक आणि सल्लागार मंडळाने आप-आपल्या परीने संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे. सोबतच पतसंस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग आणि पिग्मी एजेंट या सर्वानी देखील अतिशय परिश्रमपूर्वक संस्थेच्या प्रगतीसाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे. शेवटी सर्व सभासद आणि ठेवीदार वर्गाच्या विश्वासामुळे संस्था अशी दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरली आहे. यापुढे देखील पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करून सभासद ठेवीदारांचे हित जोपासत एक आदर्श पतसंस्था म्हणून छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था ओळख निर्माण करण्यासाठी कार्यरत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतच राहू.

सभासद ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी, पिग्मी एजंट तसेच संचालक व सल्लागार मंडळ, सहकार विभागाचे प्रशासकीय अधिकारी अशा सर्वांचेच मनःपूर्वकआभार.

Scroll to Top